रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 6 एप्रिल 2024 (15:27 IST)

दिल्लीत लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

baby
CBI ने आज दिल्लीत अनेक भागात छापे टाकून लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन नवजात बाळांची सुटका करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण लहान मुलांच्या खरेदी-विक्रीशी संबंधित आहे. 

दिल्लीच्या केशवपूरम परिसरातून आता पर्यंत 7-8 मुलांची सुटका केली आहे. या प्रकरणी एका महिलेची चौकशी केली जात आहे. तिच्यावर लहान मुले चोरून अटक केलेल्या व्यक्तीला विकण्याचा आरोप आहे. 
शुक्रवार पासून सीबीआयने छापे टाकायला सुरु केले असून सीबीआयच्या पथकाला एका घरातून दोन नवजात बाळ आढळले. 

बाल तस्करी मध्ये पथकाने हातात पर्यंत 8 मुलांची सुटका केली आहे. या प्रकरणात काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे त्यात रुग्णालयाचे वार्डबॉय आणि काही स्त्री- पुरुषांचा समावेश आहे. सध्या ताब्यात घेतलेल्या लोकांची चौकशी सुरु  आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. सीबीआय गेल्या काही दिवसांपासून मुलांच्या तस्करीच्या संशयित प्रकरणांचा तपास करत होती. हे छापे आणि अटक त्याच तपासाचा भाग आहेत. सुटका करण्यात आलेली अर्भकं सध्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आहेत.
 
 Edited by - Priya Dixit