बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 (14:34 IST)

दिल्लीत महिलेवर सात दिवस बलात्कार,मित्रा कडून मारहाण , आरोपीला अटक

देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथून दिल्लीत  आलेल्या एका महिलेवर तिच्याच मित्राने सात दिवस बलात्कार केला आणि मारहाण केली. एवढेच नाही तर क्रूरपणाच्या सर्व मर्यादा ओलांडत त्याने महिलेला त्रास देण्याच्या उद्देश्याने तिच्यावर गरम वरण ओतले. पारस  असे या आरोपी मित्राचे नाव आहे. पारसला अटक करण्यात आली असून त्याच्यावर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधांसह विविध आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
महिलेला एम्समध्ये दाखल करण्यात आले तेव्हा तिच्या शरीरावर जवळपास 20 जखमांच्या खुणा होत्या. ही महिला आरोपीच्या फोनवरून संपर्कात आली होती आणि सुमारे महिनाभर त्याच्यासोबत राहत होती.
 
सदर  घटना 30 जानेवारी रोजी उघडकीस आली, जेव्हा नेब सराई पोलिस स्टेशनला पीसीआर कॉल आला की एका महिलेला तिचा पती मारहाण करत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि महिलेची सुटका करून तिला एम्समध्ये नेले.
 
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा पीडितेने सांगितले की ती दार्जिलिंग, पश्चिम बंगालची रहिवासी आहे आणि फोनवरून आरोपीच्या संपर्कात आली होती." अधिकाऱ्याने सांगितले की, तिची पारसशी मैत्री होती आणि ती गेल्या 3-4 महिन्यांपासून त्याच्या संपर्कात होती.
 
महिलेने सांगितले की तिला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बेंगळुरूला पोहोचणार होती.कारण तिला तिथे घरगुती कामाची नौकरी मिळाली होती. तिची ट्रेन दिल्लीवरून जाणार असल्याने तिने दिल्लीला थांबून पारस ला भेटण्याचा विचार केला. पारस ने तिला दिल्लीलाच थांबायला सांगितले त्याने तिला तिथेच नौकरी शोधून देण्याचे आश्वासन दिले. त्यावरून ती त्याच्यासोबत राजू पार्क  मध्ये राहू लागली. 
 
काही दिवसानंतर आरोपींने महिलेला मारण्यास सुरु केले. तिच्यावर बलात्कार केला. एकदा त्याने तिच्यावर गरम  डाळ ओतून दिली. ती भाजली. महिलेने त्याची तक्रार पोलिसांत केली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार दुखापत करणे बलात्कार करण्याच्या प्रकरणात एफ आय आर नोंदवला असून आरोपी पारसला  2 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे. 
आरोपी पारस  हा उत्तराखंडचा राहणारा असून तो एका हॉटेल मध्ये आचारी म्हणून काम करतो. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit