रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 8 जून 2021 (13:04 IST)

पश्चिम बंगाल: मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबाला दोन लाख रुपयांची भरपाई

पश्चिम बंगालमधील दक्षिण भागात तीन जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने 26 जणांचा मृत्यू झाला आहे. कोलकातासह अनेक जिल्ह्यामंध्ये जोरदार पावसाने हाजरी लावली. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदीही संवेदना व्यक्त केल्या आहेत.
 
सोमवारी दुपार ते सायंकाळ या दरम्यान दक्षिण बंगालमध्ये वादळी वार्‍यासह पाऊस पडला आणि सतत वीज कोसळली. अशा परिस्थितीत घराबाहेर पडलेल्या बर्‍याच जणांचा वीज पडल्याने मृत्यू झाला. पूर्व मेदनापूर आणि बांकुरामध्येही 2-2 लोकांचा मृत्यू झाला आहे. झारखंडमधील रामगड जिल्ह्यातील पश्चिम बोकारो ओपी भागात वीज कोसळल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाला. हुगळी जिल्ह्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर मुर्शिदाबाद जिल्ह्यात 9 लोकांचा मृत्यू झाला आहे तर पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. हावडा जिल्ह्यातही वीज कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबाला दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून मरण पावलेल्यांसाठी संवेदना व्यक्त केल्या आणि नुकसान भरपाईची घोषणा केली.
 
पश्चिम बंगालमध्ये या हंगामात अचानक जोरदार गडगडाटी वादळासह मुसळधार पाऊस पडला, ज्याला कालबैसाखी म्हणतात. दर वर्षी कालबैसाखी दरम्यान वीज पडणे किंवा पडणारी झाडे किंवा करंटमुळे बरेच लोक मरतात.
 
आसाममध्ये वीज कोसळल्याने 18 हत्तींचा मृत्यू झाला
यापूर्वी आसाममधील हत्तींवर आकाशाच्या विजेने कहर केला होता. 12 मेच्या रात्री वीज कोसळ्याने 18 हत्ती मरण पावले. निसर्गाचा हा कहर टाठियोटोली रेंज कुंडोली वनक्षेत्रात झाला होता.