शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जून 2017 (16:27 IST)

मान्सून गोव्यात दाखल

काही दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून अखेरीस गोव्यात दाखल झाला आहे.  याआधी असा अंदाज स्कायमॅटने वर्तवला होता. स्कायमॅटचा हा अंदाज खरा ठरला आहे.  सर्वसाधारण वेळापत्रकानुसार मान्सून गोवामार्गे सात जून रोजी महाराष्ट्रात दाखल होतो. पण, अनेकदा अनुकूल परिस्थितीअभावी ही तारीख पुढे मागे होते. यंदाही ही तारीख  पुढे गेली आहे. बुधवारी मान्सून अरबी समुद्राच्या मध्येकडील आणखी काही भाग, केरळ, तामिळनाडूचा उर्वरित भाग, कर्नाटकच्या किनारी भागाकडील बहुतांश भाग, कर्नाटकचा दक्षिणेकडील काही भाग, रायलसीमाचा आणखी काही भाग, आंध्र प्रदेशचा किनारी भाग व बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल झाला. पुढील तीन ते चार दिवसात मान्सून संपूर्ण गोवा, अरबी समुद्राच्या मध्येकडील आणखी काही भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.