शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2016 (10:36 IST)

आता ‘नीट’ प्रादेशिक भाषांमध्येही होणार

net exam in regional language
आगामी वर्षापासून राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘नीट’  ची परीक्षा  इंग्रजीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्येही होणार आहे.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत या निर्णयाबाबत माहिती दिली. ही परिक्षा इंग्रजीसह मराठी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, तामिळ आणि तेलुगू या प्रादेशिक भाषांमध्येही  देता येणार आहे. यासाठी केंद्राने सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांशी चर्चाही केली आहे. राज्य सरकारांच्या आरक्षणाबाबतच्या धोरणाला कोणताही धक्का ‘नीट’संदर्भातील या नव्या निर्णयामुळे लागणार नाही असेही केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.