Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पद्मावतः लष्करातील जवानांनी अन्नत्याग करावा

Updated: सोमवार, 22 जानेवारी 2018 (14:06 IST)
 
करणी सेनेचे प्रमुख महिपाल सिंह मकराना यांनी हे आवाहन केले आहे. सीमेवर देशाचे संरक्षण करणार्‍या जवानांनीही राणी पद्मावतीच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी पुढे यावे. तुमच्या बहिणींचा सन्मान आणि इभ्रतीचा हा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हीही एका दिवसासाठी लष्करातील मेसच्या जेवणावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन महिपाल सिंह मकराना यांनी केले आहे.
 
सरकार जर ऐकतच नसेल तर क्षत्रिय जवानांनी एका दिवसासाठी शस्त्र खाली ठेवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसुन्न जोशी यांनी हरयाणात पायही ठेवू नये, असा इशाराही त्यांनी दिला. राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह कालवी यांनीही मकराना यांच्या निर्णयाचे समर्थन केले. सिनेमागृहात हा चित्रपट दाखवला तर जनताच संचारबंदी लागू करेल, असे कालवी म्हणाले. 'पद्मावत' प्रदर्शित करण्याची परवानगी देणार्‍या, तसेच त्याचे समर्थन करणार्‍यांना जयपूरमध्ये प्रवेश देणार नाही, असेही सिंह यांनी म्हटले आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments