शनिवार, 24 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 (11:17 IST)

पाकिस्तानमध्ये पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवादी हल्ला

Marathi news
आतापर्यंत ५७ पोलीस ठार, ३ दहशतवाद्यांचा खात्मा
पाकिस्तानमध्ये क्वेटा येथे असलेल्या पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात आतापर्यत ५७  पोलीस ठार झाले असून अनेक जण जखमी आहेत. यात पोलीस ट्रेनिंग सेंटरवर पाच ते सहा दहशतवादी सोमवारी रात्री गोळीबार करत सेंटरमध्ये घुसले. यावेळी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत पोलिसांनी सुद्धा गोळीबार केला. पोलिसांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र सेंटरमधील होस्टेलमध्ये असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीसांना काही दहशतवाद्यांनी ओलीस ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. सेंटरमध्ये ५०० हून अधिक प्रशिक्षणार्थी पोलीस आहेत. आतापर्यंत २००  प्रशिक्षणार्थी पोलीसांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.