Festival Posters
✕

ICSE 10th Result: आयसीएसई दहावीचा निकाल : मुंबईची जुही कजारिया देशात पहिली

Updated: बुधवार, 8 मे 2019 (12:58 IST)
 
आयसीएसई दहावीच्या परीक्षेत मुंबईच्या जमनाबाई नरसी स्कूलची फोरम संजनवाला, गुंडेचा एज्युकेशन अ‍ॅकॅडमीची अनुश्री चौधरी, चिल्ड्रन्स अ‍ॅकॅडमीची अनुष्का अग्निहोत्री आणि ठाण्याच्या श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेचा यश भन्साळी या चौघांनी ९९.४० टक्के गुण मिळवत संयुक्तपणे दुसरा क्रमांक पटकावला. तर ९९.२० टक्के गुण मिळवत मुंबईतील द कॅथेड्रल अ‍ॅण्ड जॉन कॅनॉन स्कूलचा वीर बन्सल, जमनाबाई नरसी स्कूलचा जुगल पटेल, मानेकजी कुपर एज्युकेशन ट्रस्टचा करण अंद्रादे, विबग्योर हायस्कूलचा झरवान श्रॉफ, रायन इंटरनॅशनल स्कूलचा हुसैन बसराई, बॉम्बे स्कॉटिश स्कूलचा अमन झवेरी, पी.जी. गरोडीया स्कूलचा हर्ष व्होरा आणि ठाण्याच्या सिंघानिया हायस्कूलचा ओजस देशपांडे आणि आदित्य वाकचौरे हे नऊ जण देशात तिसरे (पान १ वरून) आले. देश व परदेशातील आयसीएसई दहावी निकाल ९८.५४ टक्के लागला आहे. त्यामध्ये महाराष्टाचा निकाल सरस असून महाराष्टातून दहावीचा निकाल ९९.८५ टक्के इतका विक्रमी लागला आहे. यंदा आयसीएसई १० वीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत निकालाच्या टक्केवारीत किंचित वाढ झाली आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments