रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (21:02 IST)

shraddha murder case : आफताब पूनावालाची पॉलीग्राफ चाचणी, धक्कादायक खुलासे

shradha valkar
नवी दिल्ली. श्रद्धा हत्येतील आरोपी आफताब पूनावालाची पॉलीग्राफ चाचणी केली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, दिल्ली पोलीस आफताबसोबत एफएसएलमध्ये पोहोचले. दिल्ली पोलिसांनी पूनावाला याच्या छतरपूर फ्लॅटमधून 5 चाकू जप्त केले आहेत. आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाली आहे.
 
तळमजल्यावर मानसशास्त्रीय विभागात ही चाचणी घेतली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॉलीग्राफ टेस्टमध्ये धक्कादायक खुलासे झाले आहेत.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हत्येनंतर आफताबने एकापेक्षा जास्त शस्त्रांचा वापर केल्याचे समोर आले आहे.
 
काल ही परीक्षा होणार होती, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. रिपोर्ट्सनुसार, आफताबकडून 50 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले आहेत.