शनिवार, 9 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 26 मार्च 2023 (13:36 IST)

हैदराबादच्या कुशाईगुडा येथे एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

death
हैदराबाद शहरातील कुशाईगुडा भागात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली.
 
मयतां मध्ये सतीश त्यांची पत्नी वेधा आणि निशिकेत (9) आणि निहाल (5) अशी दोन मुले आहेत. अधिका-यांनी सांगितले की, ही घटना शुक्रवारी रात्री घडल्याचा संशय आहे, परंतु पोलिसांना शनिवारी दुपारी माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून गुन्हा दाखल करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. 
 
आई वडील आणि त्यांच्या दोन मुलांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की दोन्ही मुले आरोग्याच्या समस्या (मानसिकदृष्ट्या अस्वस्थ) होते. उपचार करूनही मुले बरी होत नव्हती. त्यामुळे पालक नैराश्यात गेले आणि संपूर्ण कुटुंबांनी विषप्राशन करून आत्महत्या केली.
 
शुक्रवारी रात्री मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली. ते पुढे म्हणाले की, मृतांचे मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत. मृतदेहांचे शवविच्छेदन अद्याप झालेले नाही सध्या तपास सुरू आहे.
 
Edited By - Priya Dixit