सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 मार्च 2023 (20:47 IST)

राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसकडून तीव्र आंदोलन

rahul gandhi
नाशिक : नाशिकमध्ये राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. नाशिक शहरातील शालिमार चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर काँग्रेसकडून तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी मोदी आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राहुल गांधी यांची लोकसभा अध्यक्षांनी खासदारकी रद्द केली आहे. सूरत कोर्टाकडून राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.
 
यावेळी देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी’ अशी जोरदार घोषणाबाजी करत  राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. भाजपकडून दडपशाही आणि सुडाचे राजकारण करण्यात येत असून राहुल गांधींची खासदारकी परत देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
 
हे लोकशाहीला काळिमा फासणारे असून हे सूडबुद्धीच राजकारण आहे. राहुल गांधी हे देशाचा, जनतेचा आवाज आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभरातील नागरिक जोडले गेले, अनेक घोटाळे बाहेर आले, तरीही भाजप सरकार हे घोटाळे करणाऱ्या नेत्यांना संरक्षण देत आरोप काँग्रेस आंदोलकाकडून करण्यात आला.

Edited by : Ratnadeep Ranshoor