शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (17:10 IST)

सपा खासदाराने लोकसभा अध्यक्षाच्या दिशेने कागद फेकले

लोकसभेमध्ये पुन्हा विरोधकांनी संसदीय मर्यादा ओलांडली. समाजवादी पक्षाचे खासदार अक्षय यादव यांनी रागात सभागृहात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या दिशेने कागद फेकले. लोकसभा अध्यक्ष विरोधकांचा गदारोळ थांबवत सभागृहातील कामकाज सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार घडला आहे.विरोधकांचा नोटाबंदी निर्णयाविरोधात गोंधळ सुरू होता. यावेळी लोकसभा अध्यक्ष ब-याच वेळ  विरोधकांना संसदेचे कामकाज सुरू करण्याचे आवाहन करत होत्या. मात्र, विरोधक  त्यांचे म्हणणे ऐकत नव्हते.  त्यानंतर आसनावर उठून निघून जात असताना तेव्हा सपा खासदार अक्षय यादव यांनी काही कागद त्यांच्या दिशेने भिरकावले. ज्यातील एक कागद अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यावर पडला.