शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (15:41 IST)

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी केली टीए जवानाचा अपहरण करून हत्या

death
दक्षिण काश्मीर मध्ये अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग परिसरात उत्रुसू जंगलातून प्रादेशिक लष्कराच्या (टीए) जवानाचा मृतदेह सापडला आहे.या जवानाची अपहरण करून निर्घृण हत्या केली. मुकेधामपोरा नोगामचे रहिवासी असलेले जवान हिलाल अहमद भट मंगळवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. ते बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यावर भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर शोध यंत्रणाने शोध मोहीम सुरु केले. 
 
 टेरिटोरियल आर्मीचा एक सैनिक बेपत्ता झाल्याने ही कारवाई रात्रभर सुरू राहिली. कारवाईदरम्यान सुरक्षा दल जंगलात हरवलेल्या सैनिकाचा शोध घेत होते. त्यांची कसून झडती घेतली असता जवानाचा मृतदेह सापडला. आवश्यक प्रक्रियेनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जवानाच्या मृत्यूचे कारण अद्याप शोधले जात आहे. या प्रकरणी प्राथमिक तपास सुरु केला आहे. जवानाच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. 
सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने ही दुःखद घटना असल्याचे सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे ते म्हणाले. 
Edited By - Priya Dixit