शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

'वेबदुनिया'चे 18 वर्ष

'वेबदुनिया'ची कहाणी सुरू होते 18 वर्षांपूर्वी अर्थातच 23 सप्टेंबर, 1999 पासून. तेव्हा इंटरनेटवर इंग्रजी भाषेचे साम्राज्य होते. अशा काळात हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मलयालम भाषेत पोर्टलची सुरुवात एक अभूतपूर्व आणि कल्पनाशक्तिपूर्ण पाऊल होते. 
 
भाषिक क्रांती म्हणूनदेखील हा दिवस आठवण्यासारखा आहे. 'वेबदुनिया'ने या 18 वर्षांच्या प्रवासात अनेक चढउतार देखील बघितले मात्र प्रवास निरंतर चालू राहिला. या दरम्यान अनेकदा पोर्टलचे रूप बदलले तर 2007 मध्ये 'मराठी' आणि 'गुजराती' पोर्टलदेखील सुरू करण्यात आले. या दरम्यानच पोर्टलचे युनिकोड फॉन्ट मध्ये परिवर्तिन केले गेले.
 
ऑनलाईन पत्रकारितेच्या क्षेत्रात 'वेबदुनिया'ने नेहमीच नवीन प्रतिमान स्थापित केले. 'वेब'वर व्हिडिओ समाचार, वेब संपादकीय 'वेबवार्ता', चित्रपट परीक्षण यात सर्वांत पहिले पाऊल टाकण्याचे श्रेय हे 'वेबदुनिया' जातं. याच शृंखलेत एकदा पुन्हा वेबदुनिया नवीन सजावटीसह आपल्या समोर आहे. सर्वात विशेष म्हणजे याचा मोबाइल अॅप ज्या माध्यमातून आपण बातम्या आणि व्हिडिओ बघू शकता यासोबतच 'वेब रिपोर्टर' बनून सामाजिक जबाबदारीही पेळू शकता. आपण वेबदुनिया अॅपद्वारे स्वत: वेब रिपोर्टर बनून आपल्या जवळपास घडत असलेल्या घटनांचे फोटो, व्हिडिओ आणि समाचार पाठवू शकता.
 
'वेबदुनिया'वर केवळ समाचार नव्हे तर धर्म-संस्कृती, ज्योतिष, आरोग्य, चित्रपट आणि समकालीन विषयांवरील लेखांसह लोकप्रिय आणि रोचक विषयांवर हजारोच्या संख्येत व्हिडिओ उपलब्ध आहेत. 'वेबदुनिया'च्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर साडे 5 हजारापेक्षा अधिक व्हिडिओ उपलब्ध आहे आणि सुमारे एक लाख सब्सक्राइबर आहेत. यासह फेसबुक, तावीतर, इंस्टाग्राम, शेयर चॅट इत्यादी सोशल मीडिया मंचावर 'वेबदुनिया'ची सशक्त और प्रभावशाली उपस्थिती आहे.
 
'वेबदुनिया'चे हे यश निरंतर अशाच गतीने वाढत असून आपल्या वाचकांचा विश्वास कायम ठेवत लांब प्रवास गाठत आहे तसेच ऑनलाईन पत्रकारितेच्या क्षेत्रात आणखी यश मिळवणे हा ध्येय आहेच.