शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

अकबर-बिरबलाची आधुनिक कथा

अकबर बिरबल सभेत बसून गोष्टी करत होते. तेव्हाचं अकबर म्हणाला मला या राज्यातील 5 मूर्ख शोधून दाखवं. राजाचा आदेश ऐकून बिरबलाने शोध सुरू केला. एका महिन्यानंतर बिरबल दोन लोकांना घेऊन परतला तर अकबर म्हणाला, मी तर तुला 5 मूर्ख आण्यासाठी सांगितले होते आणि तू फक्त दोनचं घेऊन आला.



पहिला मूर्ख: यावर बिरबल म्हणाला, सम्राट! हा पहिला मूर्ख आहे. मी याला बैलगाडीवर बसून जड बॅगचं ओझं डोक्यावर घेताना पाहिले. कारण विचारल्यावर हा म्हणाला की बैलाला जास्त ओझं नको म्हणून मी ते डोक्यावर घेतलं आहे. या प्रकारे हा पहिला मूर्ख आहे.

दुसरा मूर्ख: हा दुसरा मूर्ख जो आपल्या म्हशीला गवत खिलवण्यासाठी गच्चीवर घेऊन जातो. कारण विचारल्यावर म्हणाला की गच्चीवर गवत उगते म्हणून मी म्हशीला वरती नेतो. हा माणूस गच्चीवरील गवत कापून फेकू शकत नाही आणि म्हशीला वर घेऊन जातो म्हणजेच की हा दुसरा मूर्ख आहेत. तिसरा मूर्ख: सम्राट! आपल्या राज्यात इतके काम आहे, पूर्ण राज्याची नीती मला संभालायची आहे. असे असूनही मी या मूर्खांना शोधण्यासाठी एक महिना वाया घालवला म्हणून तिसरा मूर्ख मीच आहे. चौथा मूर्ख: सम्राट! पूर्ण राज्याची जबाबदारी आपल्यावर आहे. सुपीक डोके असणार्‍यांकडून आपण कामाची अपेक्षा ठेवू शकतो आणि मूर्ख लोकं आमच्यासाठी मुळीच कामाचे नाही तरीही आपण मूर्खांच्या शोधात आहे या अर्थी आपण चौथे मूर्ख आहात. पाचवा मूर्ख: सम्राट! आता मी सांगू इच्छित आहोत की सगळ्यांना इतके काम आहेत. आपआपल्या नोकरी-धंध्यातील इतके महत्त्वाचे काम सोडून जो हा किस्सा वाचत आहे आणि पाचवा मूर्ख कोण हे माहीत करण्यासाठी अजून ही वाचतोय तोच पाचवा मूर्ख आहेत.