Daily Horoscope
✕

बिपीन रावत कोण आहे, जाणून घ्या त्यांच्याबद्दल खास गोष्टी

Updated: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (15:30 IST)
 
शिक्षण
बिपिन रावत यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमधून पदवी प्राप्त केली आहे.
आयएमए डेहराडून येथे त्यांना 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' प्रदान करण्यात आला.
देवी अहिल्या विद्यापीठातून संरक्षण आणि व्यवस्थापन अभ्यासात एम फिल पदवी.
मद्रास विद्यापीठातून स्ट्रॅटेजिक आणि डिफेन्स स्टडीजमध्ये एम.फिल.
2011 मध्ये चौधरी चरण सिंग विद्यापीठातून मिलिटरी मीडिया स्टडीजमध्ये पीएचडी.

बिपिन रावत 2016 मध्ये लष्करप्रमुख झाले. सीडीएस बनण्यापूर्वी बिपिन रावत 27 वे लष्करप्रमुख होते. लष्करप्रमुख बनण्याआधी, 1 सप्टेंबर 2016 रोजी त्यांची भारतीय लष्कराचे उप-सेनाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
 
विशिष्ट सेवांसाठी सन्मानित
 
जनरल बिपिन रावत यांना उच्च उंचीवरील लढाऊ क्षेत्रे आणि बंडखोरीविरोधी कारवाया करण्याचा अनुभव आहे. त्यांनी पूर्व सेक्टरमध्ये इन्फंट्री बटालियनचे नेतृत्व केले आहे. काश्मीर खोऱ्यात राष्ट्रीय रायफल्स सेक्टर आणि इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्वही केले आहे. डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज कोर्सचे माजी विद्यार्थी, जनरल बिपिन रावत यांनी लष्करात 40 वर्षांहून अधिक काळ देशाची सेवा केली आहे. त्यांना शौर्य आणि विशिष्ट सेवांसाठी UISM, AVSM, YSM, SM ने सन्मानित करण्यात आले आहे.
 
राष्ट्रीय सुरक्षा आणि लीडरशिपवर अनेक लेख
त्यांनी 'राष्ट्रीय सुरक्षा' आणि 'लीडरशिप' वर अनेक लेख लिहिले आहेत, जे विविध मासिके आणि प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यांनी मद्रास विश्वविद्यालयाहून रक्षा अध्ययनात एम. फिल ची डिग्री मिळविली आहे. त्यांनी मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर स्टडीजमध्ये डिप्लोमा केला असून सैन्य मीडिया रणनीतिक अध्ययनवर आपलं शोध पूर्ण केले आहे आणि 2011 मध्ये चौधरी चरण सिंह विश्वविद्यालय, मेरठहून डॉक्टरेट ऑफ फिलॉसफी (पीएचडी) ने त्यांना सन्मानित केले गेले.
 
लष्करी सेवा
राजपूत कुटुंबात जन्मलेल्या रावत यांच्या अनेक पिढ्या लष्करात आहेत.
जानेवारी 1979 मध्ये लष्करात पहिली नियुक्ती मिझोराममध्ये मिळाली.
नेफा परिसरात तैनात असताना त्यांनी बटालियनचे नेतृत्व केले.
कांगोमध्ये संयुक्त राष्ट्राच्या पीसकीपिंग फोर्सचे नेतृत्व केले.
01 सप्टेंबर 2016 रोजी लष्कराचे उपप्रमुख पद स्वीकारले.
31 डिसेंबर 2016 रोजी सेना प्रमुख पद.
1 जानेवारी 2020 रोजी सीडीएस (CDS) म्हणून नियुक्त

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments