बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

बीएसएनएलच्या या पॅकमध्ये वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉल

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने 1,097 रुपयांचा नवीन रिचार्ज पॅक लॉच केला आहे. हे पॅक रिचार्ज केल्यावर बीएसएनएल ग्राहकांना अनलिमिटेड कॉलसह 365 दिवसांसाठी 25 जीबी डेटा मिळेल. 
 
नवीन रिचार्ज पॅक 6 जानेवारी 2019 पर्यंत उपलब्ध आहे. बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाइटनुसार ग्राहकांसाठी 1,097 रूपयांचा प्रीपेड रिचार्ज पॅक कोलकातामध्ये उपलब्ध आहे. अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स पॅकमध्ये उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, वापरण्यासाठी एकूण 25 जीबी डेटा प्रदान केला जातो. याचा अर्थ असा की वापरकर्त्यास दररोज 70 एमबी डेटा मिळतो. 365 दिवस वैधतेच्या या योजनेत कोणतीही एसएमएस सुविधा नाही.
 
बीएसएनएलच्या 1,097 चा रिचार्ज त्या ग्राहकांसाठी आहे ज्यांना कॉलची गरज अधिक आहे. या पॅकमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुद्धा काही सीमा नाही. यापूर्वी जूनमध्ये बीएसएनएलने 1,999 चा रिचार्ज पॅक आणला होता. 365 दिवसांच्या वैधतेसाठी, वापरकर्त्यास या योजनेत वापरण्यासाठी दररोज 2 जीबी डेटा मिळतो. आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलसह दररोज 100 एसएमएस प्राप्त होतात.