गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 29 ऑगस्ट 2018 (12:31 IST)

पाच कॅमेर्‍यांचा फोन येणार...

मोबाइल प्रेमींमध्ये सध्या डीएसएलआरसारखे फोटो काढणार्‍या ड्युअल कॅमेर्‍याची क्रेझ आहे. मात्र, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात एक नावाजलेली कंपनी एकूण 5 कॅमेरे असणारा स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. म्हणजेच पाठीमागे तीन आणि पुढे दोन कॅमेरे असणार आहेत.
 
दक्षिण कोरियाची कंपनी एलजीने नुकताच 39 हजारांत जी 7 थिंक हा फोन बाजारात आणला होता. आता ही कंपनी सर्व कंपन्यांना शह देण्याच्या तयारीत आहे. LG V40 ThinQ हा पाच कॅमेरे असणारा फोन ती बाजारात उतरविण्याच्या तयारीत आहे. या फोनच्या लॉन्चिंगपूर्वीच काही फोटो लीक झाले आहेत. या फोनमध्ये पी-ओएलईडी स्क्रीन असण्याची शक्यता आहे.
 
पाच कॅमेरे असणारा LG V40 ThinQ हा जगातील पहिला फोन आहे. पाठीमागे तीन तर पुढे दोन कॅमेरे असतील. तसेच या स्मार्टफोनमध्ये एलजी डिस्प्लेवरच फिंगर प्रिंट सेंसर देईल, असे बोलले जात होते. परंतु फोटोमध्ये फोनच्या पाठीमागे फिंगर प्रिंट सेंसर दिसत आहे. 
 
ds by ZINC 
 
फोटो प्रेमींची प्रतीक्षा नोव्हेंबरमध्ये संपण्याची चिन्हे आहेत. या फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी असणार आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसरही मिळेल.