मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

आयफोनच्या बॅटरीत बिघाड, अॅपलकडून अखेर स्पष्टीकरण

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला आयफोन यूजर्सनी बॅटरीतील बिघाडाबाबत तक्रारी केल्या होत्या. आयफोन अचानक ऑफ होत असल्याचे यूजर्सकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर त्या यूजर्सना या समस्येला तोंड द्यावं लागलं, त्यांच्यासाठी अॅपलकडून आयफोन 6s डिव्हाईस रिप्लेसमेंट करून देण्यात आले.
 
यूजर्सच्या या तक्रारीबाबत अॅपलकडून चायनीज वेबसाइटवर स्पष्टीकरण जाहीर केलं. मात्र, आयफोन 6s सोबतच इतर आयफोन मॉडेल्समध्येही बॅटरीची समस्या असल्याचे यूजर्सचे म्हणणे आहे. अॅपल कंपनीच्या माहितीनुसार, केवळ आयफोन 6s मध्येच बॅटरीची समस्या आहे.
 
कोणत्याही प्रकाराची हार्डवेअरची समस्या आयफोनमध्ये नाही किंवा कोणतंही बगसुद्धा नाही. आयफोनमधील सेफ्टी फीचर्समुळे यूजर्सना या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. कोणत्याही बगमुळे बॅटरीची समस्या नाही. अॅपल आपल्या डिव्हाईसचं डिझाइन अशा प्रकारे करतं की विशिष्ट स्थितीत आयफोन बंद होईल. म्हणजे अत्यंत थंड वातावरण असेल आणि आयफोनसाठी ते घातक असेल, तर त्यावेळी आयफोन आपोआप बंद होतं. बिझनेस इन्सायडरच्या वृत्तानुसार, अॅपल स्टोअरला डिव्हाईसशी संबंधित सर्व तक्रारी मिळत आहेत आणि या तक्रारी केवळ आयफोन 6s पर्यंत मर्यादित नाहीत, तर सर्व डिव्हाईसमधील बॅटरीशी संबंधित तक्रारीही आहेत.