शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (20:47 IST)

Nokia G11 Plus: नोकियाचा धमाकेदार स्मार्टफोन, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

hmd global
HMD Global ने सणांच्या पार्श्वभूमीवर आपला नवीन स्मार्टफोन Nokia G11 Plus भारतात लॉन्च केला आहे. स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात कमी किमतीत धमाकेदार बॅटरी आणि अनेक वैशिष्ट्ये मिळतील. हा स्मार्टफोन  blueआणि charcoal grey या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
 
 कॅमेरा कसा आहे: सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. डिव्हाइस फोटोग्राफीसाठी 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि एलईडी फ्लॅश पॅक करतो.
hmd global
 कंपनीचा हा फोन Android 12 OS वर काम करतो. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Nokia G11 Plus नोकियाच्या अधिकृत वेबसाइटवर 12,499 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. Nokia G11 Plus मध्ये 6.51-इंचाचा IPS LCD पॅनल समाविष्ट आहे, जो HD+ रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
 
स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 चिपसेट वापरण्यात आला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज सह येतो. मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या मदतीने स्टोरेज वाढवता येते.