शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

Samsung ने स्वस्त केले स्मार्टफोन

सॅमसंगने आपल्या अनेक स्मार्टफोन्सच्या किमती कमी केल्या आहेत. या यादीत Samsung Galaxy S8+, J8, A6 -- 32जीबी आणि 64जीबी वॅरिएंट, A6 Plus, Galaxy J2 (2017), Galaxy J4 आणि Galaxy J7 Prime (16जीबी) सारखे स्मार्टफोन आहेत. काही दिवसांपूर्वीच लाँच केलेल्या सॅमसंग गॅलॅक्सी जे8 ची किंमत 18990 रुपये होती. स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असून आता यावर 1000 रुपयांची सूट आहे. फोनची आता किंमत 17990 रुपये आहे. 
 
सॅमसंग गॅलॅक्सी ए6 फोनची लाँचिंग किंमत 25990 रुपये होती. आता हा फोन 21990 रुपयात उपलब्ध आहे. किंमत या वर्षी जुलै महिन्यात कमी करण्यात आली होती. तसेच फोनच्या 32 जीबी असलेल्या वॅरिएंटची किंमत आता 15490 रुपये आहे. आणि 64 जीबी वॅरिएंट 16990 रुपयात उपलब्ध आहे. दोन्ही फोन 21990 रुपये आणि 22990 रुपये या किमतीवर लाँच केले गेले होते.
 
सॅमसंग गॅलॅक्सी जे7 प्राइमची किंमत देखील कमी झाली आहे. 18790 रुपयात लाँच करण्यात आलेल्या या फोनची किंमत 9990 रुपये आहे. या फोनच्या किमतीत 8990 रुपये कमी करण्यात आले आहे. फोनच्या 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज असलेल्या वॅरिएंटची किंमत कमी करण्यात आली आहे. तसेच सॅमसंग गॅलॅक्सी जे2 (2017) ची किंमत 5990 रुपये आहेत. सॅमसंग गॅलॅक्सी एस 8+ ची किंमत कमी करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 64900 रुपये किमतीवर लाँच केला गेला होता, आता फोनची किंमत 39990 रुपये आहे.