गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

'विवो व्ही 15 प्रो'मध्ये असू शकतात तीन कॅमेरे आणि पॉप-अप कॅमेरा

चिनी कंपनी विवो लवकरच नवीन पॉप सेल्फी कॅमेर्‍यासह फोन लॉन्च करणार आहे. या फोनचे नाव विवो व्ही 15 प्रो असे असू शकतं. 
 
कंपनीच्या दुसऱ्या पॉप सेल्फीसह हा दुसरा फोन असेल. विवोने प्रथम आपल्या Nexus सीरिजमध्ये पॉप सेल्फी कॅमेरा सेटअप लॉन्च केला होता. टेक वर्ल्डच्या मते, विवो व्ही 15 प्रो मध्ये तीन रीअर कॅमेरा सेटअप असेल. याव्यतिरिक्त, हा एक इनडिस्प्ले फीचर फोन असेल. 
 
लीक झालेल्या कव्हरच्या मागच्या भागावर एक मोठा कटआऊट देखील दिसत आहे ज्याने यात ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप असल्याचा अंदाज बांधला जात आहे. विवो व्ही 11 प्रो ला ड्युअल रीअर कॅमेरा सेटअपसह लॉन्च केला होता. 
 
Vivo या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देईल असे मानले जात आहे कारण की फिंगरप्रिंट सेन्सरसाठी कोणतेही कट दिसत नाहीये.