‘पप्पी दे’ असे म्हणत घरात घुसून अश्लील कृत्य करत 16 वर्षीय मुलीचा 26 वर्षीय युवकाकडून विनयभंग
पाणी मागण्याचा बहाणा करुन अल्पवयीन मुलीला मला पप्पी दे असे बोलून तिचे तोंड दाबून तिला पंलगावर पाडून अश्लील कृत्य करण्याचा प्रकार हडपसर येथील रामटेकडी परिसरात घडला आहे.
याप्रकरणी वानवडी पोलिसांनी26 वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत एका 35 वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादी यांच्या वस्तीत राहणारा 26 वर्षीय युवक फिर्यादी यांच्या घरात पाणी मागण्याच्या बहाण्याने शिरला.त्यांची 16 वर्षाची मुलगी त्याला पाणी देत असताना त्याने तिला मला पप्पी दे असे बोलून तिचे तोंड दाबले.तिला पलंगावर पाडून तिचे अंगावर पडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल,असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी तपास करीत आहेत.