शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (15:09 IST)

नवऱ्याने न विचारता पाणीपुरी आणल्याने भांडण, बायकोची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

नवऱ्याने न विचारता पाणीपुरी आणल्याने नवरा बायकोत तब्बल तीन दिवस वाद सुरू होता.अखेर बायकोने या वादानंतर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.
 
प्रतिक्षा गहिनीनाथ सरवदे (वय 23) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.याप्रकरणी पती गहिनीनाथ सरवदे (वय 33) याला पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत प्रकाश भिसे (वय 55) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मृत प्रतीक्षा आणि गहिनीनाथ यांचे 2019 मध्ये लग्न झाले होते. या दोघांनाही एक मुलगा आहे.गहिनीनाथ पुण्यातील एका चांगल्या कंपनीत कामाला होता.बायको मात्र बीड जिल्ह्यातील गावात राहत होती.काही दिवसांपूर्वी त्याने बायकोला पुण्यात आणले होते.

तीन दिवसांपूर्वी कामावरून घरी परत जात असताना गहिनीनाथने पाणीपुरी नेली होती.परंतु घरी गेल्यानंतर मला न विचारता पाणीपुरी का आणली असे सांगत प्रतिक्षाने भांडण करण्यास सुरुवात केली.याच कारणावरून त्यांच्यात मागील दोन दिवसांपासून वाद सुरू होते.याच वादातून प्रतिक्षाने शनिवारी राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.नंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचार सुरू असताना रविवारी तिचा मृत्यू झाला.भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.