गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : सोमवार, 20 मे 2024 (10:37 IST)

पुण्यामध्ये अनियंत्रित कारने दिलेल्या धडकेत 2 जणांचा मृत्यू

Accident
महाराष्ट्रातील पुण्यामध्ये एका पोर्शे कारने अनियंत्रि होऊन दोन जणांना धडक दिली आहे यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. सांगितले जात आहे की, पोर्शे कारने होणार हा पहिला अपघात आहे. 
 
महाराष्ट्रात पुण्यामध्ये शनिवारी कल्याणी नगर परिसरात एक जलद गतीने येणाऱ्या पोर्शे कारने बाईकला मागून जोरदार धडक दिली आहे. धडक लागल्यानंतर बाईक चालकाचे नियंत्रण सुटले आणि अनेक मीटरपर्यंत फरपटत नेले. या भीषण अपघातामध्ये बाईक वर असलेल्या दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. 
 
पुणे सिटी मध्ये  डीसीप विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस पुढील चौकशी करीत आहे. 
 
एका व्यक्तीने पोलिसांना पुणे बैलरजवळ अपघात झाल्याची सूचना दिली. पोलिसांनी या प्रकरणात पोर्शे कारमधील अल्पवयीन ड्राइव्हरला ताब्यात घेतले आहे. जो रियल इस्टेट डेव्हलपर चा मुलगा आहे. तसेच पोलीस म्हणाले की, आरोपीची मेडिकल टेस्ट केली जाणार आहे की अपघाताच्यावेळी तो नशेत  होता का? अपघात स्थळी लोकांनी या आरोपीला मारहाण केली. त्यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.