Biodata Maker marathi
✕

मौजमजेसाठी सुशिक्षित तरुणांनी चोरल्या तब्बल ३५ दुचाकी; तिघांना अटक

Updated: बुधवार, 21 एप्रिल 2021 (08:08 IST)
 
पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांना माहिती मिळाली की, वखार महामंडळ चौक, पुणे नाशिक हायवे, भोसरी येथे दोघेजण चोरीची दुचाकी विकण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार एका पथकाने परिसरात सापळा लावला. मात्र चोरटे ठरलेल्या ठिकाणी आणि वेळी तिथे आले नाहीत. त्यातील एकजण आंबेगाव येथील असल्याची माहिती पोलिसांनी काढली आणि दरोडा विरोधी पथकाची एक टीम थेट आंबेगावला रवाना झाली.
 
तिथे पोलिसांनी संकेत धुमाळ याला १४ एप्रिल रोजी ताब्यात घेतले. धुमाळकडे चौकशी करून त्याचा दुसरा साथीदार श्रीकांत पटाडे याला ताब्यात घेतले. दोघांकडे तपास करून पोलिसांनी सुनील सुक्रे याला १५ एप्रिल रोजी ताब्यात घेतले. सुनीलवर यापूर्वी तीन वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याने या चोरट्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत असताना आरोपींकडे पोलिसांनी कसून तपास केला. तपासात तिन्ही चोरट्यांनी तब्बल ३५ दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी ३३ लाखांच्या ३५ दुचाकी अहमदपूर (लातूर), जालना, शिरपूर (धुळे), कोपरगाव, शनीशिंगणापूर (अहमदनगर), आळेफाटा, आंबेगाव, शिरूर शहरातून जप्त केल्या. आरोपी संकेत धुमाळ याचे बारावी पर्यंत शिक्षण झाले असून त्याने पुढे अॅटोमोबाईलचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तो पी. जी. कंपनीमध्ये सुपा येथे काम करीत आहे. श्रीकांत पटाडे विवाहीत असून त्याचे अकरावी पर्यंत शिक्षण झाले आहे. तो ट्रॅक्टर चालविण्याचा व्यवसाय करतो. तसेच आरोपी सुनिल सुक्रे आय. आय. बी. एम. चिखली या कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करीत होता. तसेच तो भारती विद्यापीठ कात्रज येथे गेस्ट सर्व्हिसेसच्या प्रशिक्षणासाठी असताना, त्या परिसरातील १० दुचाकी वाहने चोरी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपी सुनील हा मोटार सायकल चोरी करताना मास्टर चावीचा वापर करीत असे. वाहने चोरून ती यातील आरोपी श्रीकांत याच्या मार्फतीने गिऱ्हाईक शोधून त्यांना १५ ते ५० हजार रुपयांपर्यंत विकत असे. गाडीचे कागदपत्र नंतर देतो असे सांगून काही वाहनांवर स्वतःच्या गाडीची नंबर प्लेट टाकून, पैशांची अडचण असल्याचे कारण सांगून वाहने गहाण ठेवीत असे. मिळालेले पैसे आरोपी तिघांमध्ये वाटून मौजमजा करीत होते.या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड शहरातील १३, पुणे शहरातील १० आणि पुणे ग्रामीण मधील एक असे २४ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. अन्य वाहनांच्या मूळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये FDA ची मोठी कारवाई, चार खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बस आणि गॅस टँकरची धडक, १० जणांचा दुर्दैवी मृत्यू

मुख्यमंत्री योगी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला; आई सावित्री देव यांचे निधन

ईव्ही प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Riverची नवी इलेक्ट्रिक स्कूटर टेस्टिंगसाठी रस्त्यावर; डिझाइनने वेधले लक्ष

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक सामना होणार! सामना किती वाजता सुरू होईल?

पुढील लेख
Show comments