Dharma Sangrah
✕

बस चालकाचा महिलेवर बलात्कार!

Updated: रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (22:32 IST)
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला वाशीम जिल्ह्यातील रहिवाशी असून ती गुरूवारी एका खासगी बसने आपल्या पतीसोबत पुण्यात आली होती. रात्री पुण्यात आल्यानंतर दोघेही राहण्यासाठी खोली शोधत होते. मात्र, रात्री उशीर झाल्यामुळे खासगी बस चालकाने या दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्येच झोपण्यास सांगितले. दोघेही नवीन असल्याने त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळाने महिलेचे पती लघुशंकेसाठी गेले.

दरम्यान, महिलेचे पती लघुशंकेसाठी गेल्याचे बघताच, महिलेवर लक्ष ठेवून असलेल्या आरोपी नवनाथ याची नियत फिरली. त्याने अचानक गाडी सुरू केली आणि महिलेचे अपहरण केले. त्यानंतर स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात फुटपाथवर या महिलेला नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.  याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपी बसचालकाच्या मुसक्या आवळल्या आहे. नवनाथ शिवाजी भोंग (38) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.  

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

जळगाव जिल्ह्यात १.२५ कोटी रुपयांच्या जमिनीच्या वादातून डॉक्टरची हत्या; दोन आरोपींना अटक

जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीने नवी मुंबई न्यायालयात पाचव्या मजल्यावरून उडी मारली

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, बस उलटल्याने दोघांचा मृत्यू तर २७ जण जखमी

NTA परीक्षा पारदर्शक बनवण्यासाठी राज्य सरकारांचा सहभाग; नंदन नीलेकणी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रेयसीला मारहाण करून ठार केले; रात्रभर तिच्या मृतदेहाशेजारी बसून होता

पुढील लेख
Show comments