Festival Posters
✕

‘चेस दी व्हायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार

Updated: गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (09:40 IST)
 
पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या हस्ते  ऑनलाईन लोकार्पण झाले. 
 
शाब्बास पुणेकर”.. तुम्ही दिलेल्या वेळेत भव्य असे कोविड रुग्णालय उभारले आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या संकटाला न घाबरता आपण सामोरे जात आहोत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातही अधिकाधिक चाचण्या करून बाधितांवर वेळेत उपचार करा तसेच वयोवृद्ध आणि इतर आजाराने बाधित असलेल्या व्यक्तीवर विशेष लक्ष द्या. 
 
‘चेस दी व्हायरस’ याप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, हीच संकल्पना आपण राज्यभरात राबविणार आहोत, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
मुख्यमंत्री म्हणाले, पुण्यासोबतच पिंपरी चिंचवडमध्येही कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जम्बो रुग्णालयाची अत्यंत कमी कालावधीत उभारणी केली, ही उल्लेखनीय बाब आहे. पुण्यातील या कोविड रुग्णालयामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे असे सांगितले.
 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Auckland ODI अंशुल कंबोजने प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड पटकावला; तो आता बुमराहच्या पंक्तीत सामील झाला

LIVE: शेतकरी कर्जमाफी योजनेची चौथी यादी अमरावतीमध्ये जाहीर करण्यात आली

जळगाव : यावलमध्ये प्रेमविवाहानंतर काही दिवसांतच पत्नीची हत्या, पतीने गळा दाबून खून केल्याचा आरोप

ट्रम्प प्रशासनाकडून कठोर कारवाई; इराणला पाठिंबा देणाऱ्या ९ भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादले

ODI series भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना कधी? तारीख आणि वेळ जाणून घ्या

पुढील लेख
Show comments