रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 27 जुलै 2022 (11:45 IST)

बांधकाम व्यायसायिक डीएसके यांना दुसरा जामीन तरीही अजून तुरुंगात ,काय आहे प्रकरण जाणून घ्या

D S Kulkarni
पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना मोठा दिलासा मिळाला आहे डीएसके यांचा जामीन अखेर मंजूर करण्यात आला आहे. तरी ही त्यांना अद्याप ही तुरुंगातच राहावे लागणार आहे, कारण त्यांच्या विरोधात इतर चार ठिकाणी देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सुप्रीम कोर्टात डीएसकेंच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने  निर्णय देत अखेर डीएसकेंना जामीन मंजूर केला. दरम्यान, गेल्या चार पेक्षा जास्त वर्ष झाले डीएसके हे तुरुंगातच आहेत. ठेवीदारांनी केलेल्या गुंतवणुकीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती.
 
महाराष्ट्र सदनिका मालकीहक्क कायद्याखाली देखील डीएसकेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्याखाली देखील डीएसकेंना नुकताच जामीन मंजूर करण्यात आलेला होता. पुणे सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केला होता. त्यानंतर मंगळवारी आणखी एका गुन्ह्यात डीएसके यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. 
 
मंगळवारी डीएसके यांचे वकील आशुतोष श्रीवास्तव आणि रितेश येवलेकर यांनी सुप्रीम कोर्टात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर कोर्टाने राज्य सरकारला जामीनदार उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकार कडून जामीन अर्जाला विरोध होता. त्यांचे बँक खाते आणि संपत्ती जप्त करण्यात आली आहे.