मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जून 2020 (13:00 IST)

पुण्यात कोरोनाचा धोका कायम, पालिकेनं जाहीर केला नवा आदेश

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 10 हजार पार झाला आहे तसेच पुणे शहरात कोरोनाचे नवे हॉटस्पॉट समोर आले आहेत. पुण्यात वडारवाडी-पांडवनगर, जनवाडी-गोखलेनगर हे कोरोनाचे नवे हॉटस्पॉट असून येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या भागात तीन दिवसांची जनता संचारबंदी लागू केली आहे.
 
तसेच रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे पुणे महापालिकेनं नवीन आदेश काढला आहे. या आदेशानुसार, पुण्यात खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड्स हे कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहे. राखीव बेड्सपैकी 50 टक्के खाटा कोरोना पेशंट्सना द्याव्या लागणार आहे.
 
तसेच खासगी रुग्णालयामधील कोरोना रूग्णांचे बील मात्र पालिका भरणार नाही, असं स्पष्ट केले गेले आहे.