रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (14:40 IST)

पिंपरीत गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात पाच कामगार होरपळले

fire
पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या बौध्दनगर येथे बुधवारी पहाटे एलपीजी गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे झालेल्या स्फोटात पाच जण जखमी झाले.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.  

सदर घटना पिंपरीच्या बौध्दनगर येथे घडली असून घरगुती सिलिंडरचा स्फोट झाला.घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. 

बौध्दनगर मध्ये एका खोलीत काही कामगार वास्तव्यात आहे. सकाळी 5:30 च्या सुमारास हे कामगार स्वतःसाठी स्वयंपाक करत असताना गॅस गळतीमुळे स्फोट झाला आणि हे 5 कामगार होरपळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून  त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 
 
Edited by - Priya Dixit