Dharma Sangrah

पिंपरीत मोबाइल हिसकावण्याच्या घटना वाढल्या

Updated: मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (17:52 IST)
 
शहरातील नागरिकांच्या हातातून मोबाईल हिसकावून नेण्याचे प्रकार उघडकीस येत असून त्याबाबत विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे देखील दाखल होत आहेत. पोलिसांनी काही गुन्ह्यांची उकल करून त्यातील चोरट्यांना पकडले. मात्र तरीही मोबाईल चोरीचे तसेच वाहनचोरीचे सत्र शहरात सुरूच आहेत. रविवारी देखील तीन गुन्हे दाखल झाले. त्यामुळे मोबाईलधारक धास्तावले आहेत.
 
सागर भागवत बोरले यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोरले हे कंपनीच्या पिकअप पॉइंटवर बसची वाट पाहत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी बोरले यांच्या हातातील १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. तर अक्षय मोहन धावणे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धावणे हे रस्त्यावर थांबले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील पाच हजार रुपयांचा मोबाईल हिसका मारून नेला.
 
जुन्या मोबाईलला शहरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याचा गैरफायदा घेऊन चोरीचे मोबाईल विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवी मुंबईतील हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, महिलेला अटक

६ महिन्यांत लग्नाचा दावा! चमत्कारिक मेहंदीसाठी मंदिरात अविवाहित तरुणांची गर्दी, ३५०० किलो मेहंदी ३ तासांत संपली!

LIVE: मुंबई बीएमसीच्या आयटी विभागात १९८ कोटींचा डेटा सेंटर घोटाळा

रोनाल्डोच्या संघाने सलग ९४ सामन्यांमध्ये गोल करून जागतिक विक्रम केला

WCPL मध्ये यास्तिका भाटियाच्या जागी सुषमा वर्मा ट्रिनबागो नाइट रायडर्स संघात सामील

पुढील लेख
Show comments