बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (12:21 IST)

पुण्यातील घोरपडी 'अॅथलेटिक्स स्टेडियम 'ला नीरज चोप्राचे नाव

पुण्यातील घोरपडी येथील 'आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट 'मधील 'अॅथलेटिक्स स्टेडियम' ला टोकियो ऑलम्पिक मध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचे नाव देण्यात येणार असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते येत्या सोमवारी नामकरण होईल.या वेळी लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे व दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन उपस्थित राहणार आहे.
 
या प्रसंगी टोकियो मध्ये सहभागी झालेल्या लष्कराच्या सोळा खेळाडूंचा सत्कार देखील संरक्षण मंत्रालयाच्या हस्ते केला जाणार आहे.
 
लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे सुभेदार असलेले नीरज चोप्राने या संस्थेत भालाफेकीचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले होते. त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीच्या गौरवार्थ या संस्थेतील 'अॅथलेटिक्स स्टेडियम'आता नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स स्टेडियम,पुणे कॅंटोन्मेंट 'या नावाने ओळखले जाणार. या मुळे स्टेडियम मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या तरुण अॅथलेटिक्स ला प्रेरणा मिळेल.
 
'आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटयूट 'मध्ये हे स्टेडियम 2006 साली उभारण्यात आले.या स्टेडियम मध्ये 400 मीटर चा सिंथेटिक ट्रॅक आहे.