बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (15:49 IST)

1.50 लाखासाठी उच्चभ्रू कुटुंबात 27 वर्षीय विवाहितेचा छळ; सासू-सासऱ्यासह पतीवर FIR

तु आणि हे मुल दोघेही अपशकुनी आहेस. तु या घरात आल्यापासूनच माझ्या मुलाचा व्यवसाय तोट्यात गेला. माहेरुन 50 लाख रुपये घेऊन मगच या घरात परत ये असे म्हणत उच्चभ्रू कुटुंबातील सदस्यांनी 27 वर्षीय विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार पुण्यातउघडकीस आला आहे.
 
संबंधित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून सासरे संजय ज्ञानोबा धावडे , सासू माधवी संजय धावडे , पती मयुर संजय धावडे (सर्व रा. वसंत बंगला, लगड मळा, वडगाव खुर्द) यांच्यावर पुण्यातील  सिंहगड रोड पोलीस ठाण्यात  गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, सहा वर्षांपूर्वी मयुर धावडे याच्याशी फिर्यादीचे लग्न झाले होते. लग्नात मुलीच्या वडीलांनी 100 तोळे सोने (Gold) व तब्बल 40 किलो चांदी (Silver) भेट म्हणून दिली. हा विवाह थाटामाटात झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर मयूर व्यसनाच्या आहारी गेला. त्यातून व्यवसायाकडे दुर्लक्ष झाल्याने मयुर यांची स्वतःची कंपनी तोट्यात गेली. त्यामुळे मयूरने पत्नीस अधिकच त्रास देणे सुरू केले.
 
समाजात बदनामी नको म्हणून पत्नी सर्व सहन करत होती. मुलगा झाल्याने काही दिवस त्रास कमी झाला.मात्र त्यानंतर सासु, सासरे व पतीकडून छळ सुरू झाला. त्यांनी तु आणि तुझं मुल अपशकुनी आहे.तु आल्यापासून मुलाचा व्यवसाय तोट्यात गेला. माहेरुन 50 लाख रुपये घेऊन आल्यानंतरच घरात परत ये असे म्हणत सासू सासऱ्यांनी महिलेला घराबाहेर काढले.याला पतीनेही साथ दिली. सासरकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे  करीत आहेत.