शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (08:12 IST)

माहेराहून 100 तोळे सोने आणण्यासाठी विवाहितेचा छळ; आशिष ढोणेसह 6 जणांवर FIR

माहेरच्यांकडे 100 तोळे सोन्याची  मागणी करत असल्याने सासरच्या लोकांनी विवाहीतेचा शारीरिक आणि मानसिक  छळ केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. सासरच्या छळाला वैतागून विवाहितेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात फिर्याद दिली आहे.विवाहितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.आशिष ढोणे  (वय-33), निलीमा जाधव (वय-35), रविराज जाधव  (वय-38), तन्वी ढोणे (वय-32), रेखा ढोणे (वय-56), संग्राम ढोणे (वय-37 सर्व रा. अटल सोसायटी बिल्डींग, वसंत बाग चौक, बिबवेवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी 28 वर्षीय विवाहित महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आशिष ढोणे यांचे नोव्हेंबर 2019 मध्ये लग्न झाले आहे.लग्नानंतर आरोपींनी संगनमत करुन तू माहेरच्यांना 100 तोळे सोने आणि दोन फ्लॅटची  मागणी का करत नाही, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच आरोपींनी पीडितेला हाताने मारहाण (Beating) करुन तिचा मानसिक आणि शारिकीक छळ केला. सासरच्या लोकांकडून सतत होणाऱ्या त्रासाला वैतागून विवाहितेने पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस  करीत आहेत.