शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मार्च 2023 (10:23 IST)

पिकअप जीपची दुचाकीला धडक, पाच जणांचा मृत्यू

पुणे नगर कल्याण महामार्गावर एका भरधाव येणाऱ्या पिकअप जीप आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. रात्रीच्या अंधारात भरधाव पीकअप जीपने दोन दुचाकीसह 8 जणांना चिरडल्याची घटना नगर कल्याण महामार्गावर लवणवाडीत घडली आहे. या अपघातात चिमुकल्यासह एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर तिघे उपचारादरम्यान मृत्युमुखी झाले. 

शेतमजुरीचे काम संपवून सर्व शेत मजूर पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे गावाला जाताना रात्रीच्या अंधारात मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या पिकअप जीपच्या चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत दुचाकीसह तीन वाहनांना धडक दिली. या अपघातात आठ जण गंभीररीत्या जखमी झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत .वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहे.  

Edited By- Priya Dixit