शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 21 मे 2020 (18:10 IST)

गणरायाला मास्क लावू नये या आवाहनासह पुण्यात साध्या पद्धतीने साजरा होणार सार्वजनिक गणेशोत्सव

महाराष्ट्राची शान तसेच संपूर्ण जगात प्रसिद्ध पुण्याचा ऐतिहासिक सार्वजनिक गणेशोत्सव यंदाच्या वर्षी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
करोनामुळे उद्भवलेले संकट लक्षात घेता शहरातील मानाच्या गणपती मंडळांच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे.
 
मानाचे पाच गणेश मंडळ आणि इतर मंडळाच्या अध्यक्षांची आज व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीला कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, श्री गुरूजी तालीम मंडळ, श्री तुळशीबाग मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे गणमान्य प्रमुख उपस्थित होते. 
 
यंदा गणेशोत्सवात दरवर्षीच्या पद्धतीने उत्सवमंडप उभारून अथर्वशीर्ष पठण, पूजा-अर्चा, आरती, गणेशयाग, मंत्र-जागर असे धार्मिक कार्यक्रमपार पडतील. मात्र, इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर सर्व अटी, नियम आणि शर्तींचे काटेकोर पालन करून व शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
 
तसेच श्रींची प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन मिरवणुकीविषयीचा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीनुसार घेण्यात येईल. याचबरोबर गणेशोत्सवात कोणीही आपल्या गणरायाला कोणत्याही प्रकारचा मास्क लावू नये, जेणेकरून पावित्र्य भंग होईल. असे आवाहन सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांना करण्यात आले आहे.