सोमवार, 26 फेब्रुवारी 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By
Last Modified: बुधवार, 29 मार्च 2023 (15:06 IST)

Shri Ram Navami wishes : गाऊ तुझे किती गुण रे रामा, गाऊ किती गुण

Shri Ram Navami wishes
गाऊ तुझे किती गुण रे रामा, गाऊ किती गुण,
पुत्र म्हणोनि तूच श्रेष्ठ, काय महिमा वर्णावा,
बंधू म्हणोनि तूच असशी, उदो तुझाच व्हावा, 
गाऊ तुझे किती गुण रे रामा गाऊ किती गुण,
राजा म्हणोनि तुज सारखा नाही रे कुणी,
रामराज्या चे स्वप्नच राहिले, आता न होणे कोणी!
गाऊ तुझे किती गुण रे रामा, गाऊ किती गुण!
शिष्य तुज सारखा गुणी, गुरूवर धन्य झाले,
मारून राक्षसांना तू रे, गुरुचे पांग फेडीयले,
गाऊ तुझे किती गुण रे रामा, गाऊ किती गुण!
त्राता तुजसारखा न पहिला, उद्धार तो करण्या,
उद्धरीले अहिल्येस तूच, पापमुक्त तीस होण्या!
गाऊ तुझे किती गुण रे रामा, गाऊ किती गुण.
मित्र तुझ्यापरी न देखीयला, बंधू सम तू पाहिले,
जिंकून रावणाची लंका, राज्य बिभीषणास दिले.
गाऊ तुझे किती गुण रे रामा, गाऊ किती गुण.
यावं यावं पुनश्च येथें, राजा तुजसम व्हावा,
कर उद्धार आमचा ही आता, जीव तुज चरणी अर्पावा.
...अश्विनी थत्ते.