बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (09:02 IST)

दहावी व बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

प्रमाणपत्र (१० वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेत उत्तीर्ण न होऊ शकलेल्या तसेच एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार दहावी व बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. यानुसार ही परीक्षा ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
 
दहावीची परीक्षा ६ ते २३ ऑक्टोबरदरम्या होणार आहे. बारावीची परीक्षा ६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान, तर व्यवसाय अभ्यासक्रम असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ६ ते २४ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्याक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा १ ते २३ ऑक्टोबर तर दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयाची लेखी व प्रात्याक्षिक परीक्षा २४ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. बारावीची प्रात्याक्षिक, लेखी व श्रेणी परीक्षा १ ते २९ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. संभाव्य वेळापत्रकाबाबत अभिप्राय, सूचना व दुरुस्त्या ईमेलद्वारे १७ ऑगस्टपर्यंत [email protected] या मेलवर पाठवण्याच्या सूचना मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.