Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहावीच्या परीक्षेला सुरूवात

Updated: शुक्रवार, 1 मार्च 2024 (08:59 IST)
 
राज्य मंडळाच्या वतीने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत घेण्यात येत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दहावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत ३२ हजार १८९ ने वाढ झाली आहे. गेल्यावर्षी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यंदा खासगी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. राज्य मंडळाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिकराव बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. मार्च २०२४ च्या परीक्षेसाठी पेपरच्या नियोजित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. तसेच दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्यात येत आहेत.
 
नोंदणी केलेले विद्यार्थी
विद्यार्थी : ८,५९,४७८
विद्यार्थिनी : ७,४९,९११
तृतीयपंथी : ५६
एकूण : १६,०९,४४५

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

नेपाळमधील पुरात ७८८ जणांचा बळी, २५०० हून अधिक जण अद्याप बेपत्ता

महिला हॉकी विश्वकप: नऊ वेळच्या विजेत्या नेदरलँड्सला पराभूत करून अर्जेंटिनाने विजेतेपद पटकावले

महिला एशिया कप:भारताने थायलंडला ९४ धावांनी पराभूत केले

LIVE: अभिजीत दीपक यांचा मनोज जरांगे यांच्या उपोषणाला उघडपणे पाठिंबा

गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि मडगाव दरम्यान ४ नवीन विशेष गाड्या जाहीर

पुढील लेख
Show comments