Marathi Biodata Maker
✕

6 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल

Updated: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (08:27 IST)
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 38 पंचायत समित्यांतील मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या 6 जिल्हा परिषदेच्या 85 निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या 144 निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या. 
 
त्यापैकी धुळे जिल्हा परिषदेच्या एका आणि शिरपूर (जि. धुळे) पंचायत समितीच्या दोन; तर अक्कलकुवा (जि. नंदुरबार) पंचायत समितीच्या एका जागेवरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित जागांसाठी  मतदान झाले. सर्व ठिकाणी आज  सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. 
 
प्राथमिक माहितीनुसार जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी धुळे- 60,  नंदुरबार- 65, अकोला- 63, वाशीम- 65, नागपूर- 60 आणि पालघर- 65 टक्के मतदान झालं. एकूण सरासरी 63 टक्के मतदान झालं असून ग्रामीण भागातील जनतेचा कौल कोणाला मिळणार हे उद्या स्पष्ट होणार आहे. 
 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

MSRTC कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

LIVE: दिवाळीपूर्वी एमएसआरटीसी कर्मचाऱ्यांना १०,००० रुपयांचे अनुदान मिळणार

LIVE: नवी मुंबईहून १४ आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होऊ शकतात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आशियाई पॅरा गेम्समधील पदक विजेत्यांची भेट घेतली

मुलगी माहेरी परत आली तर त्यात लाजिरवाणे काही नाही! दिल्ली उच्च न्यायालय म्हणाले-लग्न वाचवण्याच्या प्रयत्नात तिचा छळ नको

पुढील लेख
Show comments