सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2024 (20:37 IST)

Nashik : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची दोन मुलींसह आत्महत्या

suicide
पती आणि सासरच्या त्रासाने कंटाळून नाशिकच्या आडगावात एका विवाहितेने दोन मुलींना संपवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी मुलीसोबत व्हिडीओ बनवला आहे. पोलिसांनी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
 
सदर घटना नाशिकात आडगाव परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा पती आणि सासरच्या लोकांकडून छळ केला जात होता.सततच्या जाचाला कंटाळून या महिलेंने आपल्या 7 आणि 8 वर्षाच्या मुलींना ठार मारून आत्महत्या केली असून आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या पती, दीर, आणि बहिणीच्या नावाने सुसाईड नोट लिहून मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवला आहे. तिने सुसाईड नोट मध्ये आपल्या पतीला आणि सासरच्या लोकांना जबाबदार ठरवले आहे. तसेच माझा आणि मुलीचा अंत्यसंस्कार माझ्या आईने आणि भावाने करावा असे लिहून ठेवले आहे. 
 
परिसरातील नागरिकांनी ही घटना पोलिसांना सांगितल्यावर आडगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची नोंद केली असून पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
.  
Edited By- Priya Dixit