Dharma Sangrah

विहिरीचा कठडा तुटला अनर्थ झाला तिघांचा मृत्यू तर अनेक अडकले

बुधवार, 3 ऑक्टोबर 2018 (08:59 IST)
मुंबई येथील विलेपार्ले परिसरातील धार्मिक कार्यक्रमासाठी महिला रुईया बंगलो, दीक्षित रोड, सॅटेलाईट हॉटेलजवळ एकत्र आल्या होत्या. मात्र, या ठिकाणी पूजेचा कार्यक्रम सुरु असताना विहिरीचा कठडा तुटून विहिरीत काही महिला व मुले पडली. अचानक झालेल्या या प्रकाराने एकाच गोंधळ उडाला होता. लगेच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी पोचले आणि विहिरीत पडलेल्यांना बाहेर काढले. जखमींना व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल असून, दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. माधवी पांडे (वय - ४९), रेणू यादव (वय २०) आणि ३ वर्षीय दिव्या अशी मृतांची नावं आहेत. सध्या घटनास्थळी रात्री उशीर पर्यंत बचाव सुरु होते. याबाबत विलेपार्ले पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणात महिला विलेपार्ले येथील रुईया बंगलो जवळील विहिरीवर असलेल्या लोखंडी जाळीवर बसून पूजा करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत सात महिलांना वाचविण्यात यश आलं असून अजून काही महिला अडकल्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृत्नाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

कॉकरोच जनता पार्टी १६ जून रोजी नागपूरच्या संविधान चौकात मोठे आंदोलन करणार

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांना जयपूरमध्ये एका व्यक्तीने कानशिलात लगावली

मोदी सरकार प्रादेशिक पक्षांना उद्ध्वस्त करत आहे नाना पटोले यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

LIVE: कॉकरोच जनता पार्टी १६ जून रोजी नागपूरच्या संविधान चौकात मोठे आंदोलन करणार

सोन्याच्या दरात मोठी वाढ दर प्रति १० ग्रॅम १.५९ लाख रुपयांवर पोहोचला

पुढील लेख
Show comments