1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (21:47 IST)

आदित्य ठाकरे यांनीही सभेतून सत्तारांवर निशाणा साधत ''अब्दुल गद्दार'', असे म्हटले

aditya thackeray
राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. एकीकडे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाबरावांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केलं, तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसही मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावरुन रस्त्यावर उतरली आहे. आता, सत्तार यांनी केलेल्या विधानावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही रोखठोक भूमिका घेत सत्तारांना चांगलंच सुनावलं. 
 
अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर, राष्ट्रवादीचे नेते चांगलेच संतापले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात अब्दुल सत्तार यांच्यासारखे नेते महिलांविषयी काहीही बोलतात. तरीही ते मंत्रिपदावर राहतातच कसे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात बसू देणार नाही, असा इशाराच विद्या चव्हाण यांनी दिला आहे. यासंह, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतरही नेत्यांनी सत्तारांविरुद्ध रोष व्यक्त केला आहे. आता, आदित्य ठाकरे यांनीही बुलढाण्यातील सभेतून सत्तारांवर निशाणा साधत ''अब्दुल गद्दार'', असे म्हटले. 

Edited by -Ratnadeep Ranshoor