गुरूवार, 30 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (21:01 IST)

जंगल पूर्ण खाली झाल्यानंतर एकटे डरकाळी फोडत आहेत : नवनीत राणा

navneet rana
महिला मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तव्यावरून भाजप खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. जंगल पूर्ण खाली झाल्यानंतर एकटे डरकाळी फोडतायेत. पहिले विरोधी पक्षनेतेपद द्यावे मग मुख्यमंत्रिपद द्यावं. आता ही महिला घरातीलच आहे की बाहेरची?, घरातीलच व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याचं स्वप्न पाहत आहात का?, असं सवाल नवनीत राणांनी उपस्थित केला.
 
महिला मुख्यमंत्री नक्कीच व्हायला पाहिजे. परंतु ज्या व्यक्तीने हे वक्तव्य केलं आहे, ते त्यांच्या तोंडातून शोभत नाही. ज्यांना स्वत: मुख्यमंत्री होण्याची हौस आहे ते कसं काय हे स्वप्न पाहू शकतात. आम्ही त्यांच्या या व्यक्तव्याला गांभीर्याने घेत नाही. पण जर राज्यात महिला मुख्यमंत्री झाल्या तर गर्वच होईल, असंही नवनीत राणा म्हणाल्या.
Edited by : Ratnadeep Ranshoor