राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बाबा रामदेव यांच्याविरोधात आंदोलन
महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातले नाही तरी छान दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केले . यावरूनच आता राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या सुद्धा आक्रमक झाल्या आहेत.
बाबा रामदेव यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला आहे. रामदेव बाबाचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, रामदेवबाबा हाय हाय, समस्त महिला भगिनींचा अपमान करणार्या रामदेव बाबाचा निषेध असो, मुखी राम राम बोला याला जोड्याने हाणा. अशा जोरदार घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बाबा रामदेव यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले.
Edited By- Ratnadeep Ranshoor