1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 1 मे 2021 (09:27 IST)

शहरातील अमरधाम अपुरे पडत असताना नागापूर अमरधाममध्ये कोरोना मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था

अहमदनगरमध्ये  मृतदेह अमरधाममध्ये आणण्यास काही रुग्णवाहिका चालक सात ते आठ हजार रुपयांची मागणी करत आहे. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक भावनेने नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशन पुढाकार घेऊन नागापूर येथील कैलासधाम या स्मशानभूमीत कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीची जबाबदारी उचलली आहे. तर कोरोना रुग्णाचे मृतदेह आनण्यासाठी अत्यल्पदरात शववाहिका देखील उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी दिली.
 
 कोरोनाने शहरासह जिल्ह्याची परिस्थिती गंभीर बनली असताना, दररोज कोरोना रुग्णांचे मृतदेहांचे खच पडत आहे. याचा ताण शहरातील एकमेव अमरधामवर पडत असताना दररोज 45 पेक्षा जास्त मृतदेह अंत्यसंस्काराला येत आहे. विद्युतदाहिनीची क्षमता 20 मृतदेहाची असताना उर्वरीत मृतदेहांची ओट्यावर चिता रचून अंत्यसंस्कार करण्याचे कार्य सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये केडगाव अमरधामच्या धर्तीवर नागापूर येथे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या सुचनेनूसार कोरोनाने मृतपावलेल्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली आहे.