शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 21 मे 2023 (17:34 IST)

Beed : बीडच्या तीन भावांनी बनवले आईचे मंदिर

आई वडील हे देवा समान असतात.स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हणतात. ते खरंच आहे. आईच्या मृत्यूनंतर काही लोक त्यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न करतात काही धार्मिक कार्ये करतात. मात्र बीडच्या सावरगाव गावातील खडे वस्तीत तीन भावांनी आईच्या मृत्यू पश्चात तिची स्मृती कायम सोबत राहावी या साठी चक्क तिचे मंदिर उभारले आहे. राजेंद्र खाडे, विष्णू खाडे आणि छगन खाडे असे या तिन्ही मुलांची नावे आहेत. आपल्या आईची मूर्ती बसवण्यासाठी त्यांनी मोठं कार्यक्रमचे आयोजन केले. 
 
खाडे बंधूंच्या आईने मोठे कष्ट करून आपल्या तिन्ही मुलांचा संभाळ केला आणि त्यांना शिकवलं. वर्ष भरापूर्वी राधाबाई खाडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आईच्या मृत्यू नंतर तिघा भावांवर दुःखाचं डोंगर कोसळलं.आपल्या आईची स्मृती जिवंत राहावी आणि आपल्या सोबत कायम स्वरूप राहावी या साठी तिघांनी आईचे मंदिर बनविण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या घराच्या अंगणात आईच मंदिर उभारलं.पुण्याच्या एका मूर्तिकाराकडून त्यांनी आईची मूर्ती बनवली आणि मंदिरात बसवायची ठरवली. या साठी त्यांनी दहा लाख रुपये मोजले आहे. स्वतःच्या आईचे या पंचक्रोशीतील हे एकमेव भव्य मंदीर असणार आहे.गेल्या वर्षी राधाबाई खाडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले वर्षाच्या आत आईचे मंदिर बांधण्याचा या तिन्ही भावांचा संकल्प होता. त्यानुसार त्यांनी आईचे मंदिर उभारले. 
 



Edited by - Priya Dixit