मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 जानेवारी 2023 (08:46 IST)

बेळगाव सलग तीन दिवस शहरातील पाणीपुरवठा ठप्प

water tap
बेळगावसह संपूर्ण राज्यात एलअॅण्डटीने विविध कामे सुरू केली आहेत. पण यांचे कामकाज व्यवस्थित होत नसल्याने त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी विधानसभेत माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केली होती. तरीदेखील एलऍण्डटीच्या कामकाजात कोणताच बदल झाला नाही. आता पुन्हा बेळगावकरांना तीन दिवस पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून दि. 20 ते 22 पर्यंत सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. 24 तास पाणीपुरवठा योजनेसह शहराच्या विविध भागाचा पाणीपुरवठा बंद केला जाणार असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

मागील जुलैपासून शहरात 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आल्याने पाणीपुरवठा चार दिवसांपूर्वीच पूर्वसूचना देण्याची मागणी आता सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असून मजगाव, नानावाडी, चिदंबरनगर, शहापूर, वडगाव, जुने बेळगाव तसेच उत्तर विभागातील सह्याद्रीनगर, कुवेंपूनगर, टीव्ही सेंटर, सदाशिवनगर, अशोकनगर, माळमारुती, बसव कॉलनी, न्यू गांधीनगर, कणबर्गी, कलमेश्वरनगर, सुभाषनगर आणि कुडची अशा विविध परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. 24 तास पाणी योजनेसह या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. पण शक्यतो दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि यापुढे पाणीपुरवठा बंदबाबतची माहिती चार दिवस आधी देण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor