सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (10:00 IST)

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, शिवसेनेचा 'धनुष्यबाण' कुणाकडे? आज निर्णय

uddhav shinde
शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाला? आज यावर निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणीची दुसरी फेरी 10 जानेवारी रोजी झाली होती.
 
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेत फूट पडलीच नसल्याचा दावा करत सध्या दाखवण्यात येणारे चित्र कपोलकल्पित असल्याचा दावा केला.
 
तर शिंदे गटाने दिलेली शपथपत्रे खोटी असून या सर्वांची ओळखपरेड घ्या, तरच सत्यता समोर येईल, असेही आयोगाला सांगितले. शिंदे गटातील 7 जिल्हाप्रमुखांच्या शपथपत्रावरही त्यांनी आक्षेप नोंदवला.
 
10 जानेवारी रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीत शिंदे गटाचे अॅड. महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंचे पक्षप्रमुखपदच बेकायदा आहे. आमच्याकडे आमदार, खासदारांचे बहुमत असल्याने शिंदेंचाच पक्ष खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता.

Published By- Priya Dixit